#लॉकडाउन
#ताणतणाव
#लठ्ठपणा
#चिडचिडेपणा
ताणतणाव, लठ्ठपणा, चिडचिडेपणा हा घरा -घरात नवीन समस्या बनत चाललं आहे. मित्रहो लॉकडाउन मुळे समस्त मानव जातीवर विशिष्ट परिणाम दिसून येत आहे गेल्या दीड वर्षात विविध काळात लागलेल्या लॉकडाउन मूळे सर्वजण हैराण झालेत.अशा काळात गरज आहे एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांना धीर देण्याची.यामुळे नोकरदार ,व्यवसायिक, शेतकरी, व्यापारी, तरुण, महिला, मुलं, वृद्ध या सर्वांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागते.
नोकरी गमावण्याच्या भीतीने घरातील तरुण तरुणी तणावाखाली वावरत आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील कामगार घरात असल्याने तरुण वर्ग तणावात आहे, कोरोना च्या भीती ने घरी बसाव तर नोकरी जाण्याची भीती, बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्याची भीती,गाडीचे हप्ते, घरभाडे, वीजबिल, हॉस्पिटलचा खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च,घरखर्च याच्या ओझ्याखाली जीवन जगत आहे.
घरात सतत टीव्ही पाहुन त्यातील नकारात्मक बातम्या, त्यात भर घालत आहेत, ताण तणाव वाढवण्यास टीव्ही चॅनेल्स आणि मीडिया कारणीभूत ठरत आहेत.
कामावर,ऑफिसला जाण्यासाठी लागणारी बस, कामावरची जागा, ऑफिस, कॅन्टीन या संक्रमण करणाऱ्या सर्वात मोठे स्त्रोत आहेत त्यामुळे नोकर,कामंगार मध्ये भीतीचे सावट हे जास्तच आहे.यासाठी सर्वांनी घरातील वातावरण आनंदी हसतमुख ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
लहान मुले, वृद्ध, गृहिणी यांच्यावरही मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव दिसून येत आहे त्यांना घरातून बाहेर पडता येत नसल्याने एकलकोंडी बनत चालले आहेत वृद्ध, यांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांना गुडघे दुखी, हाय-बीपी, लो-बीपी यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लॉकडाउन मुळे लठ्ठपणाची समस्या, वजन वाढण्याची समस्या दिसून येतात.तरुण वृद्ध सगळेच मोबाइलच्या दुनियेत व्यस्त आहेत. त्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा येणाऱ्या पिढीवर फार मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो.
मुलांचे शिक्षण मित्र,शाळा, कॉलेज, वर्ग, शिक्षक त्यांना न पाहताच पुढच्या वर्गात जाऊ लागले आहेत त्यामुळे येणारी पिढी ऑनलाईन क्लासला जास्त प्राधान्य देईल, एवढं असूनही शाळेची काही कमी होताना दिसत नाही परिणामी शिक्षण पूर्ण होईल. पण समाजात वावरण्यासाठी चे शिक्षण हे चार भिंतीच्या बाहेर पडूनच घ्यावं लागतं.
घरात बसून लाखो कमवू पण पोटासाठी लागणारे अन्न ते शेतात जाऊन च पिकवाव लागतं. सगळे जग लॉकडाउन च्या छायेत् बंद झालं तरी जगाला जगवनारा हा पोशिंदयाला शेतात जाऊन काम करावाच लागतच. तुमच्या संकट समयी तो राबतोय उन्हात, पावसात, थंडीत,अन लॉकडाउन मध्ये ही...त्याच्या संकट काळात तुम्ही त्यामागे उभे राहाल हीच अपेक्षा...
.
.
हा संकटसमयी चा काळ नक्कीच निघून जाईल यासाठी आपण आपल्या घरातील वातावरण हसत-खेळत, आनंदित ठेवू, होणाऱ्या ताण-तणाव, दुष्परिणामांपासून दूर राहू.
👉🏻नियम् पाळूया,कोरोनाला हरवूया...
लेखन: दिनकर लवटे
मो: 9561051308
https://dinkarlavate.blogspot.com
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे