#तेलघाणा
#Oil_Extractors_Stone
बापरे....एवढ मोठं उखळ...
जरी हे उखळ वाटत असलं तरी ते हे उखळ नाही...
हा एक तेलघाणा आहे,असे लाकडाचा घाणा देखील पाहायला मिळतो..
अगदी जुना साधारणत: 500-600 वर्षा पूर्वीचे असा हा तेल घाणा अधुनिक यंत्रा मूळे निरुपयोगी झालाय...असे कितीतरी जुन्या वस्तू आज रस्त्याच्या कडेला, जुन्या मंदिरं परिसरांत, आपल्याला पाहायला मिळतात..यासारख्या अनेक वस्तु जुने जातं, उखळ, रांजण हे बेवारस स्थितीत पाहायला मिळतात..या वस्तुनी अनेक वर्षे पूर्वजांनी उपयोगात् आणल्या ...त्यांनी त्यांचं वैभव वाढावल, जोपसल..पण अधुनिक यंत्रानी यांची जागा घेतली आणि यांना उपयोगातुन् हद्द्पार् झाल्या..
असो पण एवढं मोठं उखळ कसं बनवलं असेल, कोणी बनवलं असेल, कश्या साठी बनवलं असेल बर ...
उत्तर सोपं असलं तरी बनवणारी व्यक्ती किती कुशल असेल.. अशी वस्तू चा वापर बैलाच्या मदतीने शेंगदाणा, तील, सूर्यफुल, नारळ, करडइ इ. पदार्थ पासून तेल काढण्या साठी करत..म्हणुन आपण याला तेलघाणा ही म्हणतो ..अश्या अडगळीत, बेवारस पडलेल्या वास्तू स्वच्छ करुन जतन करूया..नाहीतर तर या ऐतिहासीक लहान वाटणाऱ्या वास्तू मातीमोल होऊन नामशेष होतील.
लेखन:दिनकर लवटे
मो.9561051308
नमस्कार मित्रहो नवनवीन माहीती /भटकंती विषयीची माहिती आता आपण माझ्या ब्लॉगवर पाहू शकता या करता visit द्या
पुढील लिंक वर..
https://youtu.be/gmDxvDyKQFM

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा