अवकाळी म्हणजे काय?
वळवाचा पाऊस म्हणजे काय?
अवेळी काळवेळ नसताना अचानक आलेला पाऊस.
तुमच्या-आमच्या राशी चक्रात न बसणारा पाऊस....म्हणजे अवकाळी
उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्च एप्रिल मे महिन्याच्या मध्यंतरी भारतात हमखास अवकाळी पाऊस येऊन जातो.काहीच नाही झालं तरी शिमगा आणि पाडव्याला थोड्याफार प्रमाणात अवकाळी पाऊस येऊन जातो.
पण असा पाऊस मनाला आल्हाददायक आनंद देऊन जात असला तरी हा पाऊस शेतकरी बांधवांसाठी नक्कीच नक्कीच नुकसानदायी ठरतो हे निसर्गाचं चक्र असल्याने याला थांबवता येत नाही.
मानवाने आपल्या दैनंदिन कामकाजासाठी स्वतःला आणि निसर्गाला कालचक्रात बांधून ठेवला आहे.पण निसर्गाचा तसं नाही निसर्गाला मानवाने अगदी काळ,वेळ ऋतु ,महिना,वर्ष,आठवडा,दिवस यामध्ये जखडून ठेवले आहे.पृथ्वीवर होणाऱ्या हवामानाच्या बदलानुसार मानवाने उन्हाळा,पावसाळा, हिवाळा असे हवामानाचा कालचक्र बनवलंय.समुद्रावरील वारा ज्या दिशेने वाहिल त्या दिशेला तो बरसत राहणार, जिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल किती पाऊस कोसळणार.भारतातील पावसाळ्याचा काळ म्हणजे साधारणत जून ते सप्टेंबर या काळाच्या अगोदर पाऊस पडला तर आपण त्याला अवकाळी म्हणतो म्हणजेच अवेळी पडणारा पाऊस काळ वेळ नसलेला पाऊस म्हणजे अवकाळी.हा पाऊस लहान मुले पशुपक्षी यांना सुखाचा क्षण घेऊन जातो.अवकाळी पाऊस म्हणजे मुलांसाठी आनंदाची छान पावसामध्ये गारा गोळा करण्यासाठी मुलं कशाचीही पर्वा करत नाहीत मनसोक्त आनंद घेतात. थंडगार वारा ,गारा यांचा स्पर्श सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.यात सोसाट्याचा वारा अचानक तापमानात झालेला बदल ढगांची एकमेकांवर आदळून होणारा प्रचंड आवाज, विजांचा कडकडाट आपल्याला अनुभवायला येतो.असा अवकाळी पाऊस काही जणांना आनंद तर काही जणांच्या पदरात दुःख टाकून जातो.
अगदी यात मोठाली झाडे उन्मळून पडतात,पशुपक्षी यांचे निवारे जमीनदोस्त होतात,आंबा ,काजू, द्राक्षे, डाळिंब आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान करून जातो.
पण हा पाऊस जास्त दिवस राहिला तर मान्सून लांबणीवर जातो असा अंदाज बांधायला हरकत नाही.
लेखन: दिनकर लवटे
मो.9561051308
नमस्कार मित्रहो नवनवीन माहीती /भटकंती विषयीची माहिती आता आपण माझ्या ब्लॉगवर/Youtube पाहू शकता या करता visit द्या
पुढील लिंक वर..
https://youtube.com/channel/UCQ-1rJM463UnkUvvRzn07jg
https://dinkarlavate.blogspot.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा