सोमवार, १७ मे, २०२१

होयसळ_साम्राज्य आणि राजचिन्ह

 #होयसळ_साम्राज्य

#राजचिन्ह_राजप्रतिक

#Hoyasal_Dynasty

#Logo_Symbol

#Emblem



 होयसळ साम्राज्य कर्नाटकातील एक अतिशय शूर,  प्रतिभावंत,  वैभवशाली  आणि वास्तुकलेचा उत्तम उपासक,कला जोपासणारे कर्नाटक, आंध्रप्रदेशचा काही भाग आणि  तमिळनाडूचा काही भाग यावर राज्य करणारे सामर्थ्यवान राजवंश इसवी सन 950 ते 1355 या काळात होऊन गेला. होयसळ हे  मूळचे पश्चिम घाटातील मलेनाडू चे दहाव्या शतकात होयसळ राजवंश  हळूहळू डोके वर काढू लागला,  होयसळ  विषणुवरधन हे  मुळात जैन धर्माचे अनुयायी होते पण हिंदू तत्वज्ञानी रामानुजाचार्य यांच्या प्रभावाखाली येऊन हिंदू वैष्णव संप्रदायात प्रवेश करून विष्णुवर्धन असे नाव नामकरण केलं, होयसळ वंशातील महत्वकांशी अश्या या राजाने त्याला युद्धात यांचा पराभव करून दक्षिण कर्नाटक (गंगवाडी) आणि नोळंबवाडी चा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला. विष्णुवर्धन यांच्या प्रचंड पराक्रमामुळे होयसळ सम्रज्याची भरभराट झाली यानंतर वीर बल्लाळ 2 आणि वीर बल्लाळ 3 याने साम्राज्य वाढवले. बाराव्या शतकात वेस्टर्न चालुक्य आणि कल्याणी चे कल्चुरी यांच्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन कावेरी नदीच्या भूभागावर आपलं वर्चस्व निर्माण करून स्वतंत्र राज्यकारभार करू लागले,  बाराव्या शतकात इ.स.1187 मध्ये  वीर बल्लाळ 2 यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करून आपली राजधानी (कर्नाटकातील सध्या हसन जिल्हा ) प्रथम हालेबिडू  म्हणजे द्वारसमुद्र  येथे निर्माण केली, 13व्या  शतकात मुस्लिम आक्रमकांनी राजधानी बेचिराख करून भरमसाठ लूटमार केली असली अस्सल वैभव लुटू शकले नाहीत,  नंतर त्यांनी  ती बेलुर येथे हालवण्यात  आली.


कन्नड लोक कथेनुसार होयसळ यांचे प्रतीक असलेले चिन्ह म्हणजे वाघाची शिकार करणारा युवक साला नावाच्या युवकाने वाघाची शिकार केली व आपल्या जैन धर्मगुरुला ही गोष्ट सांगितली यावरून वाघाची शिकार करणारा युवक असं प्रतीक बनलं तर सांगितलं जातं जुन्या कन्नड भाषेनुसार होइ म्हणजे वध करणे, शीकार करणे, मारणे आणि मारणार युवक म्हणजे साला यावरून या साम्रज्याचे  नाव पडलं होयसाला.

अशा आशयाचा शिलालेख मध्ये विष्णुवर्धन यांनी इ.स.1157 मध्ये कोरला आहे.पण असं असलं तरी विष्णुवर्धन याने वाघाचा प्रतीक असलेल्या चोला राजवन्श यांचा पराभव करून होयसळ साम्राज्य उभं केलं यामुळे या लोककथेला आधार मानला जात नाही यामुळेच होय संघर्षाचं प्रतीक हे वाघाला मारणारा युवक असावा असं मानलं जात.



दक्षिण भारतात कला व वास्तुकला धर्म वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले, होयसळ वास्तुकलेचा उत्तम नमुना आपण बेलुर, हळेबीड, हसन, सोमनाथपूर या भागात पाहायला मिळतो त्या भागात सुंदर डोळे दिपवणारी शेकडो मंदिर आपल्याला पहायला मिळतील. असं असलं तरीही त्यांनी हिंदू धर्मावर जैन आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.


अश्या या वैभवशाली साम्रज्याचा अंत इ.स.1355 मध्ये झाला असला तरीही त्याचे वैभाव आजही अनुभवायला मिळते.


लेखन: दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

=====०रायकोटी किल्ला ०====

=====०रायकोटी किल्ला ०====== #Rayakottai_Fort #Rayakottai_Hill_Station https://youtu.be/aHvTqCxKOUU तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक ह...