#गंग_वंश_वैशिष्ट्यंपुर्ण_शिलालेख
#Ganga_Dynasty
#Featured_inscriptions
गंग वंशातील राजांनी भारतावर साधारणतः इ.स.350 ते इ.स. 1434 पर्यंत राज्य केलं, यामध्ये दक्षिण भारतातील शाखेने साधारण इ.स.350 पासून इ.स.1004 पर्यंत तलक्कड,कोलार, बंगलोर, म्हैसूर या प्रदेशावर राज्य केलं तर पूर्व भारतातील गंग वंशीय शाखेने बंगाल,आंध्र प्रदेश छत्तीसगड,या प्रदेशावर ती साधारणत इ.स.1038 पासुन इ.स.1434 पर्यंत राज्य केलं.दक्शिन् भारतातील गंग वंशीय यांचें प्रतीके असलेलीं चिन्हं या शिलालेखावर दिसून येतात यात मुख्यता रॉयल छत्री,शंख, चक्र,चंद्र आणि सूर्य अशी पाच चिन्हं दिसून येतात.(हत्ती,गोल्डन नाणे ही काही ठीकाणी पहायला मिळते) छत्री हे ही प्रतिक असल्यामुळें आपल्याला भोग नदिश्वर् मंदिरात अखंड दगडात कोरीव केलेली Royal Umbrella पहायला मिळते. असा हा एक वैशिष्ट्यंपुर्ण शिलालेख श्रीरंगपट्टणमला असुन साधारणता शिलालेखात दोन किंवा तीन चिन्हं आढळून येतात.
लेखन:दिनकर लवटे
मो: 9561051308
https://dinkarlavate.blogspot.com
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा