शनिवार, १५ एप्रिल, २०२३

=====०रायकोटी किल्ला ०====



=====०रायकोटी किल्ला ०======


#Rayakottai_Fort

#Rayakottai_Hill_Station


https://youtu.be/aHvTqCxKOUU


तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक हील स्टेशन..


बेंगलोर पासून साधारण चा 75 किलोमीटर असलेलं हा रायकोटी किला. हा किल्ला पूर्वी विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. राजा कृष्णदेवराय यांनी या किल्ल्याचे निर्माण कार्य 15 व्या शतकात  केलं.या प्रांतातील पाळेकर राजा जगदेव राया यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता.या शिवाय त्या भागातील एकूण बारा किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली असल्याने या भागाला बारा महाल असे म्हटलं जायचं. 

काहीं काळ हा किल्ला शहाजी राजे यांच्या ताब्यात होता. नंतर तो म्हैसूरच्या वोदियर् आणि टिपू सुलतान याच्या अधिपत्याखाली होता टिपू सुलतानाच्या मृत्यू नंतरचं तो इंग्रजांकडे गेला. इंग्रजानी तेथे त्यांचीं लष्करी छावनी उभारली.त्यांच्यां खुणा आजही तेथे पाहायला मिळतात.

किल्ल्याची उंची साधारणतः 1500 मिटर असावी. किल्ला चढण्यासाठी मध्यम चढणीचा आहे. किल्ल्यावर एक शिवमंदिर अणि एक गुहा ही पहायला मिळते. येथे ऋषी मुनींवरस्वामी यांनी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. 

किल्ल्यावरून सभोवतालचा प्रदेश अतिशय सुंदर अणि मनमोहक दिसतो. किल्ल्यावरची हवा अतिशय आल्हाददायक अणि मनाला चेतना देऊन जातो. 

या किल्ल्या कडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं असल्याने येथे किल्ल्यांवर सोई सुविधा नसल्याने पर्यटक इकडे येण्याचे टाळतात.पण ट्रेकिंग करण्याची आवड असणारे काय पर्यटक या किल्ल्याला जरूर भेट देतात.आपल्याला ट्रेकिंगची आवड असेल तर आपण नक्की या किल्ल्याला भेट देऊ शकता.


Note :या व्यतिरिक्त अधिक माहिती जाणकार मंडळी कडून  मिळेल ही अपेक्षा. 

आपल्याला लेख कसा वाटला नक्की कळवा. 

लेखन: दिनकर लवटे

मोबाईल: 9561051308

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे.

अधिक माहित साठी login करा 

YouTube :https://youtu.be/aHvTqCxKOUU


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

=====०रायकोटी किल्ला ०====

=====०रायकोटी किल्ला ०====== #Rayakottai_Fort #Rayakottai_Hill_Station https://youtu.be/aHvTqCxKOUU तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक ह...