रविवार, १६ मे, २०२१

करोना_आणि_वास्तव

#करोना_आणि_वास्तव 

खरच करोना आहे का? 

तर याच उत्तर होय अस म्हणावं लागेल ..

.

.

हा करोना अगदी चीन पासून आज भारतातील अगदी गल्लीबोळात,वाड्या वस्तीवर च नाही तर डोंगर दऱ्यात राहणाऱ्या पर्यंत पोहचला, याचा प्रवास सर्वांची झोप उडवतो आहे.

स्टेज 1,2,3,4 आणि आता wave 1, Wave 2 पुढे wave 3 वगैरे .....

यात नाहक बळी जातोय ते म्हणजे गरीब आणि मध्यम वर्गीय समाजाचा .....दीड वर्षाच्या काळात ना सरकार कडून ना आरोग्य यंत्रनेकडून असा काहीही ठोस माहिती देन्यात आली नाही ..शहरी भागातला करोना ग्रामीण भागात हा हा म्हणता पोहचला .आधीच ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने मर्यादित असलेल्या शहरी भागातील सुविधांवर मोठ्या प्रमाणांत ताण पडू लागला ...यातच वाढती रुग्ण संख्या अनं हॉस्पिटल चे बाजारीकरणं यात सामान्य जनता मेटाकुटीला आली आली आहे .. हे बाजारीकरण त्वरित थांबवलं पाहीजे पण सरकार याकडे लक्ष देईल असं वाटतं नाही. काही दिवस हाच रुग्ण वाढीचा दर राहिला तर आरोग्यसेवा विस्कळीत होऊन जाईल ...उपाययोजना वेळेत झाल्या नाही तर रुग्ण वाढीचा उद्रेक होईल.सुरवातीच्या काळांत करोना लक्षण असतील तर कोणते औषधोपचार करावेत टेस्ट कधी, किती दिवसांनी करावी याबद्दल पूर्ण अस्पष्टता यामुळे सर्वांच्याच मनात संभ्रम कायमचं घर करून बसला आहे.चाचणी करण्यापासून ते उपचार करुन आणि परत घरी जाण्यापर्यन्त प्रत्येक जण दलाली करतोय. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर रिपोर्ट्स् आलें कि लगेच लॅबोरेटरी कडून फोन यायला लागतात औषध हवी असतील तर या फोनवर संपर्क करा ..मग इथून पुढे शोधमोहीम चालूं, औषध, दवाखाना,ऍम्ब्युलन्स, कॉरनटाइन साठीबेड, ऍडमिट साठी बेड, वेन्तिलेटर,ऍडमिट होण्याकरता अगाऊ पैसे यात प्रत्येक वेळी रुग्णास जादा चे पैसे मोजल्या शिवाय कोणतीही वस्तू अथवा साधन उपलब्ध होत नाही.यात सामान्य माणुस कंगाल झालाय. उद्योग धंदे बंद झाले, परिणामी पैसे कमवायचे मार्ग बंद झाले असले तरी, काम बंद घरभाडे चालू,कर्जाच हफ़्ते चालू, दुकान बंद दुकानभाडे चालू, ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणायला हरकत नाही.यात अनेक परिवार उध्वस्थ् झाले,कित्येक होत आहेत,उपचार अभावी, पैश्या अभावी कितीतरी रुग्ण दगावले.यासाठी भारत सरकारने त्वरित मोफत औषधोपचार चालू करायला हवी. कितीतरी कुटुंब देशोधडीस लागले, कितीतरी अनाथ झाले, लहान मुलंबाळं आई वडिलांपासुन वेगळी होऊ लागली, नातेवाईक असतानाही बेवारस होण्याची वेळ येत आहे, छोट कुटुंब असेल तर विचार करा काय अवस्था होत असेल,वाहनाची गैरसोय यामुळे ना कोणाला भेटता येते ना, कोणी इच्छा असुन कोणाला मदतही करू शकत नाही,ना आपल्याच नात्यातील रुग्णास भेटु शकत नाही, ना त्याची जेवणाची सोय करू शकत नाही,ना कोणाच्या अंत्यविधीला ही जाऊ शकत नाही.जिवंतपणी सगळ्यांची अवहेलना होत आहे ती मेल्यानंतरही संपत नाही .हे तुमचं आमचं दुर्दैव म्हणायच की सरळ-सरळ रचलेल छडयंत्र म्हणाव.



👉 नियमा चे पालन करूया, करोना ला हद्दपार करूया.


लेखन:दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

=====०रायकोटी किल्ला ०====

=====०रायकोटी किल्ला ०====== #Rayakottai_Fort #Rayakottai_Hill_Station https://youtu.be/aHvTqCxKOUU तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक ह...