शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरून पुढे 300 वर्ष हिंदूचा दबादबा ठेऊन दक्षिण भारताला गुलामापासून मोकळे केले, बाटवलेली, पाडलेली मंदिर पुन्हा उभारू लागली, मंदिरात घंटा वाजू लागल्या, देवधर्म परकीय आक्रमकांच्या जोखडातून मोकळे झाले. धर्मासाठी अधर्मा विरूद्ध लढलेल्या, वीरपुत्रांना आपन विसरलो, 13 व्या दशकात धर्मासाठी परकीय शक्तिविरुद्ध लढलेल्या दक्षिण भारतातील हट्टीकर कुरुबा-धनगर पुत्रांचा इतिहास मात्र कोणालाही माहीत नाही, केवळ ते मेंढपाळ म्हणुन कोणी समजून घेत नाही अणि मान्यही करत नाही असच म्हणाव लागेल. जगाच्या पाठीवर ज्यांनी एक आदर्श, सुवर्णमय, दैदीप्यमान अस हिंदूराष्ट्र निर्माण केल याचा विसर पडणे हे आपल सर्वांचे दुर्दैव म्हणाव लागेल.
मनी बांधुन स्वप्नं हिंदू राष्ट्राचे
आशिर्वाद घेऊन गुरूचे
स्मरुणी पूर्वजांचे बलिदानपू
पूर्वद मर्यादे, पूर्वद मर्यादे
उभे केले हिंदूराष्ट्र.
विजयनगर.....विजयनगर.... विजयनगर....
जगापेक्षा वेगळी सोन्याची नगरी.... हम्पी... जगातील अफाट अश्या हिंदू साम्राज्याचा राजा म्हणुन सुवर्णसिंहासन वर धनगर पुत्रांची वर्णी लागली तो दिवस म्हणजे 18 एप्रिल 1336.
जगाच्या पाठीवर मेंढ्या राखणारे मेंढपाळ अणि गाई म्हशी पळणार्या पशुपालक समुदायातील लोकानी आपल्या पराक्रमावर त्याच्या मातृभूमीवर हजारो वर्षे राज्य केले. त्यांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरात कोरला गेला यामध्ये ख्रिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त,याशिवाय अनेक राजसत्ता मेंढपाळ समुदायातील लोकानी उलथून टाकल्या. याउलट भारतातील ही या समुदायाने भारतीय भूमीवर अनेक वर्षे अधिसत्ता गाजवली यामधे चंद्रगुप्त मौर्य, विजयनगर चे संगम घराणे, यादव घराणे, इंदोरचे होळकर राजघराने , तामिळनाडू जिंजी चे कोनार राजघराणे , तामिळनाडू मधील राजे वीरपंड्या, राजे पांढरे, राजे हाके, राजे थोरात, राजे नेमाजी, हांडे घराणे, दक्षिणेतील पल्लव वंश, याशिवाय अनेक अपरिचित घराण्यानी सत्ता गाजवली पण इतिहासच्या पानावर याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही यांच्यापेक्षा मोठ दुर्दैव या समाजाच नाही. जेवणाच्या पंगतीत वाढणारा अणि इतिहास लेखनाच्या पंगतीत आपला माणूस असल्याशिवाय त्या समाजाची डाळ शिजत नाही. जोपर्यंत हरीण आपल्या धावण्याची शौर्य गाथा स्वतः लिहीत नाही तोपर्यंत ती शिकार्याची गौरव गाथा बनून राहील. यापैकीच एका दक्षिण भारतातील जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या संगम घराण्याबदल ओळख या माध्यमातून करून घेणार आहोत
दक्षिण भारतातील राज्यांची कीर्ती देश-विदेशात पोहोचली होती सोन्याचा धूर इथल्या घराघरातून निघत होता म्हणायला हरकत नाही. यूरोप, आफ्रिका, आशिया खंडातील देशाबाहेर व्यापार वाढायला, 10-11 व्या शतकात दक्षिण भारत एक वैभवसंपन्न राष्ट्र बनले होतं त्यात देवगिरीचे यादव, द्वारसमुद्राचे होयसाळ वारंगळचे काकतेय राजे, चोळ, पांड्य, यांची राज्य भरभराटीला आली होती हिंदुधर्माच्या सगळीकडे उदो उदो चालू होता मोठे मंदिर बांधण्याची कामे चालू होती भगवी पताका सगळीकडे डोलाने फिरत होता पण प्रमुख राज्यकर्त्यांची दक्षिण भारतावर प्रतेक राज्यकर्त्याला दक्षिण भारतावर एकछत्री अंमल हवा होता यासाठी आपापसात ते सतत युद्ध करत असत त्यामुळे प्रजा, लष्कर यांचा कंबरड मोडून पडलं होतं
परकीय आक्रमकांच वादळ भारतवर्षावर घोंगावत असतानाही या हिंदू राजवटींनी याला मनावर घेतलं नाही याशिवाय आपापसात भांडण-युद्ध करण्यात वेळ वाया घालवू लागले उत्तर भारतात झालेल्या परकीय आक्रमणापासून दक्षिण भारतातील राजा महाराजांनी एक ही धडा घेतला नाही असेच म्हणावे लागेल आज ना उद्या वादळ आपल्यापर्यंत पोहोचेल याचं अजिबात यांना भय नव्हते.
अखेर परकीय आक्रमणाचे वारे दक्षिण भारताच्या दिशेने वाहू लागले सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगवरती दिसणारे धुळीच्या लोटच्या लोट देवगिरीच्या सीमेवरती येऊन पोहोचला.
1296मध्ये, अलाउद्दीन खल्जी याने भारतातील दख्खन
प्रदेशातील यादव (गवळी) राज्याची राजधानी देवगिरीवर हल्ला केला. यात यादव राजानी तह केला प्रतिवर्षी खंडणी देण्याच्या अटीवर युद्धाला पूर्णविराम दिला या छाप्यात अलाउद्दीनला मिळालेली संपत्ती इतकी होती की अलाउद्दीनच्या उत्तराधिकार्यांनी उधळपट्टी केल्यानंतरही त्यातील मोठा भाग 1350 च्या दशकात फिरोजशाह तुघलकाच्या कारकिर्दीपर्यंत राहिला. १६व्या शतकातील इतिहासकार फिरिश्ता यांच्या मते, अलाउद्दीनने मिळवलेल्या संपत्तीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होता.
600 मण सोने,
1,000 मण चांदी
7 मण मोती
माणिक, नीलम, हिरे आणि पन्नासह 2 मण मौल्यवान दगड
4,000 रेशीम आणि इतर वस्तू
कदाचित यापेक्षा ही अधिक असू शकते.
१३०० च्या दशकात, जेव्हा रामचंद्रने दिल्लीला वार्षिक खंडणी पाठवणे बंद केले, तेव्हा अलाउद्दीनने त्याला वश करण्यासाठी 1308 मोठे सैन्य पाठवले. यात यादव राजाचा पराभव झाला. देवगिरीच्या या दुसर्या मोहिमेमुळे रामचंद्र अलाउद्दीनचा जामीनदार बनला. आणि यादव साम्राज्याचा शेवट झाला.
याप्रमाणे, एकामागोमाग वारांगळ चे काकतेय,होयसाल पांड्य, चोळ अश्या दक्षिण भारतातील सर्व सत्ता संपुष्टात आल्या.
संगम घराने-कुरुबा-धनगर-हटकर
तुंगभद्रे च्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या संगम परिवारातील कुरुबा (धनगर-हटकर) समाजातील भावना संगम हे वारंगळच्या काकतेय राजदरबारात मोठे सरदार/कोषागार होते. यांचा बेलारी, हम्पी, तुंगभद्रा नदीच्या खोर्यात दबदबा होता. अतीशय शूर, धाडसी, काटक अशी लोक या भागात वास्तव्यास होती, सोबतीला रामोशी समाजातील अनेक वस्त्या या भागात होत्या.
रामायणातही हंपी आणि आसपासच्या प्रदेशाचा संदर्भ
देतो. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची राजधानी किष्किंधा ही अनेगोंडीजवळ वसलेली असल्याचे सांगितले जाते. 'सीता सरोवरा', 'रामपद', वाली भंडारा', 'सुग्रीवाची गुहा' आणि 'शबरीचा आश्रम' अशी नावे असलेली ठिकाणे त्या महान महाकाव्याच्या आठवणी आपल्यासमोर आणतात. आसपास टेकड्या 'ऋष्यमूका', 'मल्या-वंता' आणि 'माटुंगा' या नावाने प्रसिद्ध आहेत; ही नावे रामायणात आढळतात.
त्या काळात राजा प्रतापरुद्र काकतेय संस्थांनचा राज्य कारभार पाहत होते. त्यांच्या दरबारी भावना संगम काम करत होते. भावना संगम यांचा विवाह कम्पली राज्याचे राजे रामाराजे याची बहीण..... हिच्याशी झाला ते काकतेय दरबारात कोषागार प्रमुख म्हणुन काम करत होते..
यादरम्यान यांच्या पोटी महाभारतातील पाच पांडवांचा पुनर्जन्म झाला म्हणण्याला हरकत नाही, त्यानीच पुढे दक्षिणेत हिंदू राष्ट्र निर्माण केल . विजयनगर साम्राज्याचा संस्थापक भावना संगम यांच्या पोटी पाच रत्ननी जन्म घेतला घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला अणि तेव्हापासुनच स्वातंत्र्य साम्राज्याची स्वप्न उरी बाळगणाऱ्या सामान्य कुरुबा समाजातील सरदाराचे वारगाल च्या काकतेय राज्याच्या दरबारात वजन वाढू लागले. या लाडक्या हक्कराया, बुक्कारया ,कंपना, मुद्दप्पा, मराप्पा अशी पाच वीरपुत्रांना राजकीय प्रशिक्षण देऊ लागले आणि हेच ते पाच पांडव ज्यानी भारतवर्षाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल. ज्याप्रमाणे पांडवानी अधर्माचा पराभव करून सत्याचे/धर्माचे राज्य आणले. अगदी त्याप्रमाणे या कुरुबा मेंढपाळ बांधवांनी मुस्लीम आक्रमकांनी गिळंकृत केलेल राज्य परत काबीज करून हिंदू धर्माची सुवर्ण पताका पुढची 300 वर्षे अखंड ठेवली
लहान वयात त्यांना घरची लष्करी परंपरा असल्याने, मल्लविद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी, याचे अंश रक्तात असल्याने त्यात त्यांना पारंगत, तरबेज होण्यात वेळ लागला नाही, पिढीजात समाजाच्या परंपरेमुळे वडीलधारि मंडळीना नेहमी आदराने, सन्मानाने सामोरे जात. यामुळे साम्राज्य उभे करताना या पाचही बांधवांनी आपल्या वडील बंधूंनी नेमून दिलेले कार्य, वचन अगदी मरेपर्यंत पळाल. त्यामुळे या भावंडांना कधी सत्ता संघर्ष करावा लावला नाही अगदी याच कारणामुळे पूर्ण दक्षिण भारतावर हुकुमत गाजवणे या संगम बंधूना खूप सोईस्कर झाल. पुढे ते काकतेय दरबारात काम करू लागले.
देवगिरी च्या यादवांचे खरे वारसदार हे धनगर च म्हणावे लागतील. संस्कृत मध्ये धेनु म्हणजे गाय,धेनु, ज्याच्याकडे गाईचे धन.... गोधन तो धनगर... याबरोबर त्यांच्याकडे मेंढ्या असत.. सभोवतालच्या नैसर्गिक वातावरण नुसार ते आपला व्यवसाय करत. धेनुगर या शब्दापासूनच धनगर या शब्दाची उत्पत्ती झाली असावी. कदाचित देवगिरी च्या पतनानंतर त्यांनी आपली ओळख लपवली असावी अणि ते दक्षिणेत आले असावेत पण याची स्पष्टोक्ती मिळत नाही अणि नाकारता ही येत नाही....
काकतेय साम्राज्याच्या पाडावानंतर बर्याच सरदारांना पकडून त्यांना मुसलमान बनवण्यात आल त्यांना बंदी बनवून दिल्लीला नेण्यात आल. यात हक्करया अणि बुक्करया यांचा ही समावेश होता.. करारी बाणा, लढाऊणा, साहसी नेतृत्व, लष्करी नान, त्याची वर्तन, आचरणाने त्यांनी मुस्लिम सरदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना दक्षिण काबीज करून घेण्यासाठी परत पाठवून दिले. याचा फायदा घेऊन त्यांनी साम्राज्य निर्माण करण्याची इच्छा त्याचे वडील भावना संगम याना बोलून दाखवली यावर त्यांनी त्याचे गुरू विद्यारण्य याना भेटण्याचा सल्ला दिला.. गुरूंचा आशिर्वाद घेऊन सभोवतालच्या सर्व समाजातील सरदारांना सोबत घेऊन नव्या हिंदू साम्राज्याचा संकल्प केला.
पण गरम रक्ताचे हे हट्टीकर कुरुबा-धनगर शांत बसतील ते कसले. 13 व्या शतकात तुंगभद्रे तीरावर कुरुबा समाजातील जमिनदारांच्या भेटगाठी वाढल्या.. पै-पाहुण्या बोलावणं धाडले.. सांगावा धाडले.. बैठका झाल्या निर्णय झाला प्रत्येकाच्या घरातील माणूस हक्क बुक्काच्या सोबत राहील. हळव्या मनाच्या या समुदायातील लोकानी हक्क-बुक्काच्या शब्द तळहातावर झेलला आणि आपल रक्त या साम्राज्यासाठी सांडल. मुस्लिम आक्रमणाने कंबरडे मोडलेले सर्व लहान मोठे राजे, पाळेगार, सरदार यांचे मोठे सहाय्य वीर पुत्रांना मिळाल. दक्षिण भारतातील सर्व समुदायातील लोकाना एकत्र करून 18 एप्रिल 1336 विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. पुढे संपूर्ण दक्षिण भारत आपल्या साम्राज्यास जोडला अन अखंड 300 वर्षे राज्य केला.
पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे चार शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.
बुक्क भूपति राया
१०८२-१०८७
हरिहर राया- पहिला
१०८७-११०४
बुक्क महाराया
११०४-११२६
सदाशिव राया
११२६-११५२
पुरंदर राया
११५२-१२०७
प्रताप देव राया
१२०७-१२२७
वीर प्रताप देवराया
१२२७-१२४२
प्रताप वेंकट राया
१२४२-१२५१
बुक्क भूपति राया- दोन
१२५१-१२६०
हरिहर राया- दोन
१२६०-१२८०
बुक्कन्ना वोड़यारुराया- पहिला
१२८०-१२८५
युवराजा कुमार कंपना राया
१२८५-१२९०
देव राया -१ १२९०
गुंडम्मा राया १२९०
बुक्क राया- पहिला
१२९०-१२९४
संगमा राया १२९४- यांचा पुत्र भावना संगम, म्हणुन संगम घराने असा उल्लेख केला जातो
हरिहर राया- तीसरा १२९४
युवराजा कुमार कंपना राया १२९४
बुक्क राया- दोन
१२९४-१२९५
बुक्कन्ना वोड़यारुराया- पहिला
१२९५-१३०४
अभिनवा बुक्क राया
१३०४-१३०६
बुक्क राया- दोन
१३०६-१३२२
बुक्क राया- तृतीय
१३२२-१३३०
नरसिंम्हा राया
१३३०-१३३२
देव राया- द्वितीय
१३३२-१३३९
मल्लिकार्जुन राया
१३३९-१३४८
अच्युत देवराया
१३४८-१३६०
कृष्ण राया
१३६०-१३८०
यीम्मड़ी हरिहर राया
१३८०-१३९०
देव राया-
२ १३९०-१४०४
बुक्क राया-
४ १४०४-१४०५
वीरूपाक्ष राया-
१ १४०५-१४०६
देव राया-
३ १४०६-१४२२
रामचंद्र राय वीर १४२२
वीर विजय बुक्क राय
१४२२-१४२४
देव राय
२ १४२४-१४४६
त्र्यंबक राया
१४४६-१४६०
मल्लिकार्जुन राय
१४६०-१४६५
विरुपक्ष राय
२ १४६५-१४८५
प्रौढ राय १४८५
सालुव घराणे
नरसिंहदेवरायः इ.स.
१४८५-१४९१
तिम्मा भूपाल: १४९१
नरसिंहराय-१:
१४९१-१५०५
तुलुव घराणे
नरसानायकः
१४९१-१५०३
वीरनरसिंहरायः
१५०३-१५०९
कृष्णदेवरायः
१५०९-१५२९
अच्युतदेवरायः
१५२९-१५४२
सदाशिवरायः
१५४२-१५७०
अरविदू घराणे
अलियरामरायः
१५४२-१५६५
तुरुमलदेवरायः
१५६५-१५७२
श्रीरंग-१:
१५७२-१५८६
वेंकट-२:
१५८६-१६१४
श्रीरंग-२: १६१४
रामदेव:
१६१७-१६३२
वेंकट-३:
१६३२-१६४२
श्रीरंग-३: इ.स.
१६४२- १६४६
References :1)वारंगलच्या दरबारात हरिहर आणि बुक्का हे कुरुबा जातीचे कोषागार अधिकारी होते. मॅन्सेल लाँगवर्थ डेम्स , पोर्तुगीज भाषेचे विद्वान, दुआर्टे बार्बोसाच्या पुस्तकाच्या भाषांतरात असे साक्ष देतात की संगमा घराणे कुरुबा वंशाचे होते.
2) A forgotten empire of Vijaynagar - Robert swells
3)Bellary District Gazzet
4) Arunachala - Anant Narayan Rao.
5)Beginning of vijaynagar history - H. Heras,S.J
6)Karnatakda veer kshatriyararu - Sham. Ba. Joshi