------० कृष्णामाई ०------
अंगणी अवतरली कृष्णामाई......
मा. उमाजीराव सनमडीकर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या सततचा पाठपुरावा यातून ही जन्म घेतलेली ही अमूल्य अशी जीवनदायीनी योजना....म्हैसाळ उपसा सिंचन योजना..साधारणत: 200 ते 250 किमी चा प्रवास करून आज आपल्या सर्वांच्या दारात कृष्णामाई उतरली.
एप्रिल 1984 साली या प्रकल्पाला मिरज,तासगाव,कवठेमहन्काळ,जत अशी मंजुरी मिळाली असली तरी जत शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला मंजुरी मिळाली नव्हती.
मा. उमाजीराव सनमडीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा मुळे 1994 -95 मध्ये टप्प्याला मंजुरी मिळाली. जतचा भुभाग हा डोंगर ,पठारी,असमतल असल्यामुळे या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळणे आणि खर्चही खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचे मंजुरी मिळण्यास खूप अडचणी आल्या. असमतल भुभाग असल्यामुळे झालेल्या सर्वेक्षणात वारंवार बदल करून, नवीन सर्वे करण्यात आला यात बराच वेळ गेला.
मध्यंतरी अनेक सरकारे बदलली कधी निधीअभावी तर कधी राजकीय आकसा पोटी, प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास सुमारे पंचवीस वर्षे लागली.
तालुक्याच्या विकासासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली जमिन, तर कित्येक शेतकऱ्यांची घरे या सर्वेक्षणात जमीनदोस्त झाली, यामध्ये अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिलेले योगदान विसरून चालनार नाही.सततचा दुष्काळ आणि कमी पर्जन्यमान यामुळे येथे दारिद्र बघायला मिळतं, यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी पशुधनावर अवलंबून आहे, संपूर्ण तालुक्यात बारमाही वाहणारी नदी किंवा वर्षभर पुरेल असेल तलाव या भागात नाही यामुळे येथील शेती पूर्ण पावसावर अवलंबून असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.
तरीही दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्यांनीही थेंब थेंब पाण्यावर डाळिंब, द्राक्ष, बोर यांच्या बागा फुलवल्या पण, सन 2001-2002 मध्ये दुष्काळाने परत बागा उदवस्थ् झाल्या. पण इथला शेतकरी खचेल तो कसला परत उठला, कंबर कसून नव्या जोमाने आज परत तो बागायती क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे निसर्ग नक्कीच त्याला साथ देईल हीच अपेक्षा.
दारी आलेल्या कृष्णामाईचे पाणी पाहून शेतकरी राजाच्या डोळ्यात पाणी तरंगल.. मा.उमाजीराव सनमडीकर, मा. विलासराव जगताप, मा.जमदाडे साहेब, मा.सुनील भैय्या पवार, मा. विक्रम दादा सावंत, मा. जयंतराव पाटील यांनी सर्वांनी सतत पाठपुरावा करून जत तालुक्याला नवसंजीवनी दिली याचा पुरेपूर फायदा तालुक्यातील शेतकरी बांधवांना होईल.
कायमचा दुष्काळी असणारा हा तालुका सुजलाम सुफलाम होईल ह्यात वाद नाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात काम करून सर्वांगीण विकास घडवून आणून आणला पाहिजे यातून सधन शेतकरी, सधन बागायतदार पिढी निर्माण होऊन तालुक्याच्या विकासाचा भाग बनतील.
गेल्या अनेक पिढ्या कृष्णा-कोयनेच्या नावे गीत गात असत, त्यांची थोरवी गात असत, त्यांनी गायलेली थोरवी आज कृष्णामाई ने ऐकली म्हणायचं..
कृष्णा कोयना च चांगभलं..
हाल्याळ नदीचे चांगलं....
पूर्वजांनी, तुम्ही-आम्ही कृष्णामाई ला हात जोडून केलेल्या नमस्काराच आज फळ आज मिळालं असं म्हणायला हरकत नाही ...
कृष्णेच्या पाण्याची लई पुण्याई..
जिथे जाई तिथे सुखसोयी
अंगणी अवतरली कृष्णामाई..
अंगणी अवतरली कृष्णामाई...
हे कृष्णामाई कित्येक वर्षे पाण्यासाठी धडपडणाऱ्या तूझी वाट पाहणाऱ्या बळीराजाला सूखी कर समृद्ध कर.....
लेखन : दिनकर लवटे
मो: 9561051308
https://dinkarlavate.blogspot.com
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे.
सुंदर शब्दांकन...
उत्तर द्याहटवा