सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

उपळी बुरुज

 https://youtu.be/u0nuGerE5VE

मित्रांनो विजापूर मधील आदीलशाही सल्तनत  ने आपल्या दोनशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये विजापुर मध्ये  भरपूर वास्तू बांधल्या त्या वास्तूमध्ये आपल्याला उपळी बुरुज नावाची एक वास्तू पाहायला मिळते, यालाच हैदर खान बुरुज ही म्हटल जात. 

1)  उपळी बुरुज/हैदर खान बुरुज :

हा बुरुज हैदर खान याने इसवीसन 1583 ते 1584 या कालखंडात बांधला. या बुरुजा चा आकार हा गोलाकार अंडाकृती असा पाहायला मिळतो. या बुरुजा वर तसा शिलालेख ही पहायला मिळतो. या बुरुजा वर जाण्यासाठी बुरुजाच्याभोवती गोलाकार पायर्‍या आहेत. विजापूर च्या सुरक्षेसाठी हा बुरुज बांधण्यात आला. बुरुजाच्या वर दोन तोफा ठेवण्यात आल्या असून त्यातील एक तोफ 30 फुट, तर दुसरी 19 फुट लांब आहे. ही वास्तू विजापूर शहरातील सर्वांत उंच अशी वास्तू आहे.


3) लांडा कसाब तोफ :

लांडा कसाब तोफ या ऐतिहासिक अश्या ठेव्या फारशी कुणाला माहिती नाही. विजापूर च्या RTO ऑफिस जवळ असणार्‍या तटबंदीच्या बुरुजावर ही तोफ पाहायला मिळते. येथे एकूण दोन तोफा आहेत यातील एक तोफ 20 फुट लांब तर त्याचा बाहेरचा व्यास 4.5 फुट आहे म्हणजे आपण कल्पना करू शकतो ही तोफ किती मोठी अणि वजनदार आसू शकते. या तोफाचे वजन साधारणतः 40-50  टन आहे. ही बांगडी प्रकारात मोडणारी तोफ आहे. येथील दुसरी ही अपूर्ण अवस्थेत आहे त्यामूळे याची लांबी साधारण 6-7 फूट आहे. 


ही तोफ याच जाग्यावर बनवली असे स्थानिक नागरिक सांगतात. बांगडी प्रकारातील ह्या तोफेची प्रत्येक रिंग जोडून ही 20 फुट लांबीची तोफ बनवण्यात आली. विजापूर मधील असणार्‍या 96 बुरुजा वर अश्या अनेक तोफा पूर्वी ठेवल्या होत्या पण यातील काही तोफा आज पाहायला मिळतात.16 व्या शतकात विजापूर च्या संरक्षण साठी साधारणतः 1000 तोफा असल्याच मानल जाते.

दिनकर लवटे

=====०रायकोटी किल्ला ०====

=====०रायकोटी किल्ला ०====== #Rayakottai_Fort #Rayakottai_Hill_Station https://youtu.be/aHvTqCxKOUU तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक ह...